पंतप्रधान मुद्रा योजना
पीएमएमवाय योजनेअंतर्गत कर्ज उत्पादन, व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध आहे. संबंधित कृषी कार्यात गुंतलेले उद्योजक मुद्रा कर्जासाठीदेखील अर्ज करु शकतात. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची किमान रक्कम नाही, तर पीएमएमवाय अंतर्गत घेता येणारी कमाल कर्जाची रक्कम दहा लाख रुपये आहे.कर्जदारांनी मुद्रा कर्ज घेतल्यास त्यांना प्रक्रिया शुल्क देण्याची किंवा संपार्श्विक ऑफर देण्याची आवश्यकता नाही. मुद्रा कर्जावरील व्याज दर मार्जिनल कॉस्ट ऑफ लेन्डिंग रेट (Marginal Cost of Lending Rate) किंवा एमसीएलआर (MCLR) द्वारे निर्धारित केले जाते, ज्याची गणना (RBI)आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाते.
मुद्रा कर्ज ही एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे या योजने अंतर्गत बिगर शेती आणि बिगर कार्पोरेट सुक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते या संस्थांना (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड) या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.
प्रक्रिया शुल्क किशोर आणि शिशु कर्जासाठी शुन्य तर तरुण कर्जाचा ०.५ टक्के रक्कम हे प्रक्रिया शुल्क वेगवेगळ्या बँकांनुसार आकारले जातात.
जर तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले, तर कर्ज घेतल्यापासून तीन ते पाच वर्ष हा त्या कर्जाचा परतफेड कालावधी असेल.
अश्या प्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकता, आणि आपल्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळवू शकता.