Document

Our Work

"Unmesh Bhaiyyasaheb Patil made revolutionalary changes as well as motivated digitalization programs after getting elected as an MP"

Year 2020

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केला नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार (02-01-2021)

पारोळा -- तालुक्यातील वसंतवाडी ग्रामपंचायतीने सर्व ग्रामस्थांना एकत्र करीत दोन हजार लोकवस्तीच्या गावात सलोखा कायम राहावा यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले होते.माजी सरपंच कसरचंद पवार यांच्या नेतृत्वात वसंत वाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाला मोठी मदत होणार आहे. आज या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा खासदार जनसेवा कार्यालयात खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार कार्यकर्ते सरपंच रीतेश पवार ,प्रभू पवार ,उपसरपंच इंदल जाधव ,नवनिर्वाचित सदस्य उत्तम हंसराज पवार, देविदास रामदास पवार, दगडू गंभीर पवार , इंदल बुधा पवार , विलास सोभा पवार, आबा काशिराम पवार, चत्रु जाधव, अनिल झिपा पवार ,रंजीत भोजू पवार , अनिल हरिसिंग पवार, बभूत मालू पवार , अल्कु नारायण पवार, मारू हरदेव पवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
*शिवप्रतिमा भेट देत सदस्यांचा सत्कार* खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी यांचे अभिनंदन करीत शिव प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गावाने आपल्या हेवेदावे विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र येत निवडणुक बिनविरोध केली. एक आदर्श पायंडा निर्माण केला आहे. तरूण कार्यकर्त्यांनी जेष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहवे मी आपल्या सोबत आहे अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली.


नवी दिल्ली येथे सभापती रेल्वे बोर्डाशी भेट (12-12-2020)

जळगाव मतदार संघातील विविध मुद्द्यांबाबत आणि नवीन मागणीसंदर्भात नवी दिल्ली येथे सभापती रेल्वे बोर्डाशी भेट घेतली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अनेक समस्या समजून घेत लवकरच सोडवण्यात येतील अशी ग्वाही दिली.


अध्यक्ष यू.ए.एस. अवस्थी यांच्या सोबत चर्चा (11-12-2020)

आय.एफ.एफ.सी.ओ. सदन, नवी दिल्ली येथे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, इफ्को, रसायन अभियंता, खत, कृषी व सहकारी तज्ज्ञ. ५ दशकांचा अनुभव. पूर्वीचे अध्यक्ष यू.ए.एस. अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली आय.एफ.ए. आणि कृषी मधील शेतकर्‍यांच्या सेवा क्षेत्रात नवीन उपक्रमांच्या विविध पैलूंवर चर्चा केली.


अटल भुजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील 63 गावांचा समावेश झाल्याने परिसरातील सिंचन पातळी वाढणार -- खासदार उन्मेश दादा पाटील (10-12-2020)

जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील 63 गावांचा अटल भुजल योजनेत समावेश भूजल वाढीसाठी 925 कोटींचा प्रकल्प केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना लवकरच प्रकल्पाला सुरुवात

जळगाव - राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकार कडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील 13 जिल्ह्यातील 1443 गावांची निवड करण्यात आली असून यात जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर, पारोळा या दोन तालुक्यांमधील 63 गावांचा समावेश झाल्याने या गावांना या योजनेचा लवकरच लाभ मिळणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की केंद्र सरकारने या प्रकल्पाची घोषणा 2019 मध्ये केली होती. त्यावर अध्ययन करून ती आता अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.2020 - 21 ते 2024 - 25 या पाच वर्षांच्या काळामध्ये ही योजना राबविली जाणार असून यासाठी 125 कोटी 77 लाख लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना राबवितांना अतीशोषीत, शोषित,अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल दिले गेले असून यामध्ये जळगाव लोकसभा क्षेत्रातील 63 गावांचा समावेश करण्यात आला आहे..राज्याच्या 2013 मधील भूजल अहवालानुसार 74 शोषीत,4 अंशतः शोषीत असलेली 111 पाणलोट क्षेत्रामध्ये ही योजना प्राधान्यक्रमाने राबवली जाणार असून जळगाव लोकसभा मतदारसंघातील अंमळनेर , पारोळा या तालुक्यातील 63 गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व ठिकाणी आगामी पाच वर्षाच्या काळात ही योजना राबवण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.
पारोळा तालुक्यातील गावे अंबापिंपरी ,बहादरपूर ,भोलाणे,जामदे ,बोदर्डे ,वंजारी खुर्द,हनुमंतखेडे ,इंधवे वडगाव प्र, अमळनेर,जिराळी, जोगलखेडे,कामतवाडी, खोलसर, महलपुर, मेहू, हिवरखेडा, मोरफळ, पळासखेडे सिम,पिंपळकोठा,पुनगाव, शेवगे बुद्रुक,शिरसोदे, सुमठाणे, टेहू,उंदनीखालसा,उदनी दिगर, उंदीरखेडा, वसंत नगर,विचखेडे, वाघरे, वाघरी या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. अमळनेर तालुक्यातील गावे या महत्वाकांक्षी योजनेत अमोदे,अंतुर्ली ,राजमाने,बोहरे, चौबारी ,धानोरे ,धार ,फाफोरे बुद्रुक ,गलवाडे बुद्रुक ,बोरगाव,हेडवे, हिंगणे बुद्रुक ,हिंगणे खुर्द प्र.ज.,इंद्रपिंपरी,जैतपीर,करण खेडे,काव पिंप्री,अंबारे,खापरखेडा प्र डांगरी, लाडगाव,नांदगाव, मालपुर ,मंगरूळ ,मारवाड,मुडी प्र अमळनेर,दरेगाव, प्रगणे डांगरी, सडावन खुर्द, शिरुड,टासखेडे, वाघोदे ही अमळनेर तालुक्यांतील गावे या महत्वाकांक्षी योजनेत समावेश करण्यात आलेली आहे. सिंचन पातळी वाढणार केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अटल भुजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील 63 गावांचा समावेश झाल्याने या गावांची सिंचन पातळी वाढणार असून हा परिसर अधिक सुजलाम सुफलाम होईल अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली.


वाघळी येथे भर दुपारी खळ्यास आग लागून तीन लाखांचे नुकसान (09-12-2020)

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तहसीलदार यांना तातडीने पंचनाम्यासाठी केल्यात सूचना

वाघळी ता.चाळीसगाव -- येथील शेतकरी संजय जगन्नाथ देशमुख यांचे एकलहरे सब स्टेशन जवळील शेतातील खळ्यास आज दुपारी एक वाजता अचानक आग लागून दोन दिवसापूर्वी व्यालेली गाय आणि वासरू सह एक लाखांची कुट्टी चारा, पत्राचे शेड, शेतीचे सर्व औजारे असे सुमारे तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तातडीने जमलेल्या शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याशी संपर्क करीत घटनेची कल्पना दीली. याबाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तातडीने घटनास्थळावर जावून पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवा. संबधित शेतकऱ्यांसअधिकाधिक मदत मिळवून द्यावी अशी सूचना तहसीलदार अमोल मोरे यांना केली आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की वाघळी गावापासून एकलहरे रस्त्यावर सबस्टेशनच्या पुढे संजय जगन्नाथ देशमुख या शेतकऱ्यांने शेत जमीन कसायला घेतली आहे. वाघळी शिवारात असलेल्या शेतजमिनीवर संजय देशमुख यांच्या मालकीच्या शेडमध्ये सुमारे आठ ते नऊ गायी असून त्यांचा दुग्ध व्यवसाय देखील आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागून या खळ्यातील गाय वासरू, खळ्यातील चारा ,कुट्टी ,लोखंडी व लाकडी बल्यांचे पत्री शेड, शेतीचे साहित्य ,दूध काढण्याची मशीन, विविध शेती अवजार हे सर्व साहित्य खाक झाले आहे. घटनास्थळावर पोलीस पाटील जयश्री ब-हाटे शेजारचे शेतकरी करीम शेख तसेच भाऊसाहेब पाटील, अरुण पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेतली. सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान या घटनेत शेतकऱ्याचे झाले असून शेतकरी घटनास्थळावर ओक्साबोक्शी रडत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले होते. शेतकऱ्यांचे नातेवाईक व जमलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने खासदार उमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली. संजय देशमुख या शेतकऱ्यास मदत मिळवून द्यावी अशी विनंती केली. घटनास्थळी पोलीस पाटील जयश्री ब-हाटे यांनी तातडीने जाऊन संबंधित तलाठी, विज वितरण अधिकारी यांना घटनेच्या बाबत माहिती दिली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन शेतकऱ्याचे दुभते जनावर तसेच साहित्य, शेड जळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


खासदार उन्मेश दादा पाटील यांचे पत्राद्वारे अर्थमंत्री, महसूल मंत्री, सार्वजानिक बांधकाम मंत्र्यांकडे साकडे (05-12-2020)

*प्रशासकीय इमारत प्रस्ताव मंजूर करून चाळीसगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा*

*14 कोटी 96 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित*

चाळीसगाव -- शहरात सध्या प्रशासकीय इमारत नसल्याने बहुतांशी शासकीय कार्यालये ही खाजगी इमारतीत कार्यरत आहेत. चाळीसगाव शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयासह अनेक कार्यालये खाजगी इमारतीत कार्यरत आहेत. व सदर कार्यालयासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने व शहरातील विविध ठिकाणी असल्याने चाळीसगाव शहर व तालुक्यातील लोकांना कार्यालयापर्यंत दैनंदिन व्यवहार करण्यात फार अडचणी येतात. मुख्यत्वे सह दुय्यम निबंधक वर्ग - 2 हे कार्यालय अगदी लहानश्या जागेत असुन खरेदी विक्री साठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तातडीने प्रशासकीय इमारतीचा 14 कोटी 96 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असुन हा प्रस्ताव मंजूर करून चाळीसगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पत्राद्वारे अर्थमंत्री आणि महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की चाळीसगाव शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय खाजगी इमारतीत कार्यरत आहेत. व सदर कार्यालयासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने शहर व तालुक्यातील लोकांना कार्यालयापर्यंत दैनंदिन व्यवहार करण्यात फार अडचणी येतात. दुय्यम निबंधक वर्ग - 2 हे कार्यालय अगदी लहानश्या जागेत असुन खरेदी विक्री साठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वृध्द नागरिक महीलांना तर अगदी जीव मुठीत घेऊन येथे उभे रहावे लागते ही वस्तुस्थिती आहे. लाखोंचा महसूल देणारे कार्यालय सुमारे दहा बाय दहाच्या खोलीत असुन फारच अडचणीचे आहे. दैनंदिन येणाऱ्या अभ्यागंताची व जनतेची अडचण लक्षात घेता या कार्यालयांचा सर्व कार्यालये एकाच ठिकाणी एकत्रित प्रशासकीय इमारतीत असल्याचा प्रस्ताव मंजुरीबाबत देखील यापूर्वीच 2 नोव्हेंबर 2015 तसेच 23 जून 2016 रोजी आपल्याकडे पत्र व्यवहार केला आहे. तसेच प्रशासकिय इमारत बांधकाम प्रस्ताव मान्यतेसाठी शासन दरबारी प्रलंबीत असून *सुमारे 14 कोटी 96 लाख रुपयांचा प्रस्ताव* राज्य शासनाकडे 18 मार्च 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविला आहे. ही नवीन प्रशासकीय इमारत बांधणे अत्यंत आवश्यक असुन


वास्तू विशारद कलेचा विद्यार्थी यश अनिल साळुंखे यांंनी चित्रकृती भेट दिली (05-12-2020)

चाळीसगाव येथील धुळे रोड परिसरात राहणारे आणि वास्तू विशारद कलेचा विद्यार्थी असलेले यश अनिल साळुंखे यांनी माझे स्केच चित्र साकारत आज ही चित्रकृती भेट दिली. आपली मतदारसंघ विकासाची धडपड आम्हा तरुणांसाठी प्रेरणादायी असून या भावनेतून चित्र साकारले आहे. अशी भावना यश साळुंखे यांनी व्यक्त केली. यावेळी यश साळुंखे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या वास्तू विशारद कलेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आभार मानले. याप्रसंगी मोदी फॉर पी एम ऑर्गनायझेशन तालुकाध्यक्ष गणेश पाटील, यश पवार, युवा मोर्चा पदाधिकारी कपिल पाटील, आरोग्य दूत बबडी शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


सातारा तालुक्यातील भाटमारळी पाटील वाडा, भरतगाववाडी, कोरेगाव येथील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी (31-11-2020)

पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख तसेच शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सातारा तालुक्यातील भाटमारळी पाटील वाडा, भरतगाववाडी, कोरेगाव येथील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.यावेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Year 2019

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Year 2018

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.